पनवेल: खारघर येथे छापा टाकून विदेशी नागरिकांचे सेक्स रॅकेट खारघर पोलिसांना उध्वस्त करण्यात यश, सहा महिलांची सुटका
Panvel, Raigad | Apr 12, 2024 खारघर सेक्टर १२ इ मध्ये खारघर पोलिसांनी छापा टाकून विदेशी नागरिकांचे सेक्स रॅकेट उध्वस्त करून ६ विदेशी महिलांची सुटका केली आहे. हा छापा ११ एप्रिल रोजी दुपारी टाकला. सदर गुन्ह्यात तीन आरोपी असून पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. यातील सहा विदेशी महिलांचे पासपोर्ट, विजा तपासत त्यांना महिला सुधार केंद्रात पाठवण्यात आले आहे.