भोकरदन: अपंग महिलेच्या मानधनाच्या फाईलवर सही साठी तलाठ्याने नांजा फाट्यावर हॉटेलचे बिल भरण्याची मागणी,व्हिडिओ व्हायरल
आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील नांजा फाट्यावर एका हॉटेलमध्ये नांजा येथील सजाती तलाठी अगतराव वीर यांनी जयपुर कोठारा येथील अपंग असलेल्या एका महिलेच्या मानधनाच्या फाईलवर सही करण्यासाठी तिच्या मुलाकडे हॉटेलचे बिल भरण्याची मागणी केली आहे,त्या मुलाने हा व्हिडिओ काढून सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, आता यावर तहसीलदार काय कारवाई करणार हे पाहणार महत्त्वाचे ठरणार आहे.