औसा: आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नाला यश : तांडा विकास योजनेतून लातूर ग्रामीणमधील १४ गावांना ७० लाखांचा निधी मंजूर
Ausa, Latur | Oct 6, 2025 लातूर -भाजपाचे नेते तथा आमदार रमेशआप्पा कराड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तांडा विकास योजनेमधून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील १४ गावांतील विविध विकासकामांसाठी एकूण ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे संबंधित गावांतील नागरिक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदित झाले असून त्यांनी आमदार कराड यांचे आभार मानले आहेत.