अकोला: अकोला हादरले: सावत्र वडिलाने पाच वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार..
Akola, Akola | Sep 29, 2025 अकोला शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षीय बालिकेवर तिच्या सावत्र वडिलाने अमानुष अत्याचार केला. काल रविवार रोजी घटनेच्या दिवशी आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि मुलगी सावत्र वडिलांकडे सोपवली होती. आरोपीने रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास बालिकेवर अत्याचार केला. यादरम्यान, आईला संपूर्ण घटना कळताच तिने तात्काळ बालिकेला अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.