उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे कोंढाळी अंतर्गत पायदळ पेट्रोलिंग करून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यादरम्यान कुख्यात आरोपींना चेक करून त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी देखील करण्यात आली. या कार्यवाहीमध्ये कोंढाळी पोलीस स्टेशन यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचे अंमलदार हजर होते