भंडारा: भगतसिंग वार्ड नवीन टाकळी येथील नागरिकांनी स्वखर्चाने श्रमदानातून केले नालीवरील पुलाचे बांधकाम
भंडारा शहरातील भगतसिंग वार्ड नवीन टाकळी येथे मागील एक वर्षांपासून नाली वरील पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाला याबाबत निवेदने देऊन सदर समस्या मांडलेली होती. मात्र नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. अखेर भगतसिंग वार्ड नवीन टाकळी येथील स्थानिक नागरिकांनी दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता दरम्यान येथील नालीवरील तुटलेल्या फुलाचे स्वखर्चाने व श्रमदानातून.