चांदूर बाजार: देऊरवाडा येथून कार्तिक स्वामी महोत्सवाच्या बंदोबस्ता करिता गेलेल्या, पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी लंपास
चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील देऊरवाडा येथे कार्तिक स्वामी महोत्सवाच्या बंदोबस्ता करिता गेलेल्या, पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी लंपास केल्याची तक्रार शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दीपक सुदर्शन गवई यांनी दिनांक 9 नोव्हेंबरला 4:48 दाखल केली आहे. दीपक गवई हे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी देऊरवाडा येथे असलेल्या कार्तिक स्वामी महोत्सवाच्या बंदोबस्ता करिता गेले असता, त्यांनी आपली दुचाकी एका घरासमोर उभी केली असता, अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली