चांदूर रेल्वे: घुईखेड येथे शेतात लावलेली झटका मशीन व बॅटरी अज्ञात चोरट्याने नेली चोरून
प्रफुल शेषराव सोळंके राहणार घुईखेड यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. प्रफुल सोळंके हे शेतात चक्कर मारण्याकरता गेले असता ,शेतात लावलेली झटका मशीन अंदाजे किंमत 7000 रुपये त्याला लावलेली बॅटरी अंदाजे किंमत 5000 रुपये असा एकूण बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे .तेव्हा तळेगाव दशासर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमानव्हे गुन्ह्याची नोंद केली आहे.