अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून नवजात बाळ जिवंत राहिले असताना आईचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. विशाल विश्वनाथ दुर्गावले (रा. कुरुळ, ता. अलिबाग) यांची पत्नी विवा विशाल दुर्गावले (वय 32) या गरोदर असल्याने त्यांना 9 मार्च रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 मार्च रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रसूती होऊन त्यांनी एका बाळाला जन्म दिला.