महागाव: महागाव महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई, हिवरा संगम येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
महागाव महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत संगम हिवरा रस्त्यालगत रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली. ही कारवाई दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव तहसीलदार अभय मस्के यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान एमएच-२९ पी-८०४० या क्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करत असल्याचे आढळून आली.