मनकुरवाडी परिसरात ट्रकचा भीषण अपघात झाला असून ट्रक पलटी झाला, सुदैवाने जीवितहानी नाही ट्रकचे मोठे नुकसान
Beed, Beed | Oct 28, 2025 बीड तालुक्यातील मानकूरवाडी परिसरात आज सकाळी एक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या झाडे आणि झुडपांमुळे दृश्य अस्पष्ट झाल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने चालकाचे प्राण वाचले आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त करत, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तात्काळ रस्त्याच्या