जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध येथे 'सिकलसेल ॲनिमिया' जनजागृती व तपासणी शिबिर संपन्न जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत 'सिकलसेल ॲनिमिया जनजागृती पंधरवाडा' राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज, २९ जानेवारी २०२६ रोजी, जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध येथे भव्य जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात पार पडले