समुद्रपूर: कानकाटीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक चांदेवार यांचा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
समुद्रपुर:तालुक्यातील कानकाटी व चाकूर ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक चांदेवार यांची नुक्तीच जाम येथे प्रशासकीय बदली त्यांनी ग्रामपंचायतीला उत्तम सेवा दिली आहे.त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन कानकाटी ग्रामपंचायत कार्यालयात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश फूसे,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बलराम राऊत, उपसरपंच बेबीताई वावधणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.