दिग्रस नगर परिषदेची आमसभा आज सोमवारी नगर परिषदेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपाध्यक्षपदी सचिन बनगीनवार यांची निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाकडून रवींद्र अरगडे, तर शिवसेना शिंदे गटाकडून आदिल नागपुरे व दीपक कोठारी यांची निवड जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा उपस्थित मान्यवर, नगरसेवकानी सत्कार केला.