नागपूर पोलीस परिमंडळ ४ अंतर्गत सन २०२५ या वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सन २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये ३१ टक्के म्हणजेच एकूण ८३२ गुन्ह्यांची घट नोंदवण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त रशिमता राव एन. यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हे यश मिळाले आहे.