भिंगार शहरात भाजपकडून नागरिकांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे भिंगार शहराध्यक्ष सचिन जाधव, सरचिटणीस बाळासाहेब धाकतोडे, महेश नामदे, जय नागपुरे, सुरज देवतरसे आदी उपस्थित होते.