भोकरदन: वाढवणा येथे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग, शेती साहित्य जळून खाक
आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वाढोना या गावात असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला अचानक दुपारच्या सुमारास आग लागून गोठ्यात ठेवलेली जनावरांचा चारा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून 70/80 हजार रुपयांच साहित्य जळून खाक झाल आहे, यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विजू शकली नाही त्यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.