कोरेगाव: समिना कुरेशी यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौकशीचे निर्देश :राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर
कोरेगाव येथील व्यावसायिक सादिक कुरेशी याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी समिना शाहिद कुरेशी यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिले आहेत. सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये गुरुवारी दुपारी दोन वाजता महिला आयोगाच्या जनसुनावणी कार्यक्रमांतर्गत समिना कुरेशी व शाहिद कुरेशी यांनी चाकणकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.