अकोला: गौरक्षण रोडवर भीषण अपघात; दोन बाईकची धडक, अरविंद ठाकरे यांचा जागीच मृत्यू
Akola, Akola | Dec 2, 2025 अकोला शहरातील गौरक्षण रोडवर जॉकी शोरूमजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत व्यक्ती अरविंद सुभाष ठाकरे (वय 54, रा. शिवसेना वसाहत) अशी ओळख पटली आहे. पाणीपुरीचे दुकान बंद करून ते तुकाराम चौकाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातात ठाकरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागरिकांनी तत्काळ मदत केली