औंढा नागनाथ: अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; आदिवासी पॅंथर संघटनेचा शिरड शहापूर येथे एक तास रास्ता रोको
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे एकास मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून काहीजणांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना 22 मे रोजी घडली होती याप्रकरणी आनंदराव मोरे यांच्या फिर्यादीवरून 23 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजे दरम्यान चौंघावर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोका कायद्यान्वये कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेच्या वतीने एडवोकेट प्रशांत बोडखे यांच्या नेतृत्वाखाली एक तास रास्ता रोको आंदोलन केले