मेहकर: जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ!मेहकर–लोणारमध्ये 150 पैकी फक्त 11 कामे;आ.सिद्धार्थ खरात यांचा विधानसभेत झंझावाती टिका
मेहकर–लोणार मतदारसंघातील पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्र विकास, गृहनिर्माण, वारसा संवर्धन आदी प्रकल्पांना निधीअभावी असलेला ताण आणि प्रशासनाचा ढिम्म कारभार यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत कडाडून हल्ला चढवला. जलजीवन योजनेतील भीषण कुचराई अधोरेखित करत त्यांनी, “जलजीवन योजनेचा पुरता बट्ट्याबोळ केला आहे!” अशी थेट टीका केली.