आज दि 6 डिसेंबर सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-१२ परिसरात दुबईला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी मोठ्या रकमेसह दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिन्हाज अहमद खान आणि सीमा मिन्हाज खान हे आपला मुलगा दुबईत असल्याने ४ ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून परदेशात गेले होते. ४ डिसेंबर रोजी दुपारी स्वच्छता कर्मचारी महिला घरात आली असता मुख्य दरवाजाचे आणि कंपाउंडचे कुलूप तुटलेले आढळले. शेजाऱ्यांनी तातडीने मालकांना माहिती देताच त्यांचा भाचा अखिल मजीद यार