बारूदगोळ्याच्या मदतीने रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या चार शिकाऱ्यांना वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल बीटात रंगेहात पकडून अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये धर्मेंद्रसिंग गोविंदासी टाक (५२), जालिंदरसिंग नेपालसिंग टाक (४०), बलदेवसिंग धर्मेंद्रसिंग टाक (२३), आणि लक्ष सतीश अहिरवार (१६) यांचा समावेश असून, ते सर्व गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील रहिवासी आहेत.