वडीलांना कॉलेजला जातो म्हणून घरुन निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी सायंकाळ पर्यंत वाट बघून आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईकांकडे तसेच मित्रपरिवारात शोध घेतला, परंतु तिचा काहीही पत्ता लागला नाही. शेवटी मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठून तिची 16 वर्षाची मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय घेत तक्रार दाखल केली.