हवेली: वानवडी वाहतूक पोलिसांनीच घेतला पुढाकार; खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा
Haveli, Pune | Sep 16, 2025 पावसाळा सुरू होताच शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. दरवर्षी खड्डेमुक्त रस्त्याची आश्वासने दिली जात असली तरी वास्तवात मात्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य सुरूच राहते.महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याच्या आरोपांदरम्यान, वानवडी वाहतूक पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जाऊन थेट खड्डे बुजवण्याचा पुढाकार घेतला.