अकोला: महाबोधी महाविहारासाठी देशव्यापी जन आक्रोश आंदोलन अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
Akola, Akola | Sep 17, 2025 अकोल्यात आज भारतीय बौद्ध महासभा व समविचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी जनआक्रोश आंदोलनांतर्गत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नागपूरची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या ताब्यातील, महाबोधी महाविहार बुद्धगया, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या बौद्ध धार्मिक स्थळे मुक्तीसाठी देशभरात आंदोलन होणार असून अकोल्यात हा मोर्चा अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चात शेकडो महिला व पुरुषांचा सहभाग असेल. या आंदोलनाकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.