जालना: जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा
Jalna, Jalna | May 7, 2026 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. गुरुवार दि. 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना गावपातळीवरील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान जिल्हाधिकार्यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांची नागरिकाभिमुख सेवा जाणून घेतली.