गंगापूर: पेंडापूर फाटा येथे अपघातात एकाचा मृत्यू दोघे जखमी
संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावर पेंडापूर फाटा येथे त्यांच्या कार (एमएच.२० इजे ६३९३) चे टायर फुटल्याने कारने ४ पलट्वा घेतल्या. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांनानागरिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय दाखल केले. तेथे तपासणी करून डॉक्टरांनी राज चव्हाण यास मृत घोषित केले, तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे