भद्रावती: प्राचीन भवानी मंदिरासह अन्य मंदिरात नवरात्र ऊत्सवाला प्रारंभ.
शहरातील सुप्रसिद्ध भवानी मंदिरासह चंडीका, अंबालीका तथा अन्य मंदिरात नवरात्र ऊत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. सर्व मंदिर तथा घरोघरी विधीवत घटस्थापना करण्यात आली. सकाळपासून भाविकांनी मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यानिमीत्याने मंदिरात नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.