रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.