वाशिम: आदिवासी बांधवांचे मंगरूळपीर तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
Washim, Washim | Sep 15, 2025 अनुसूचित जमातीमध्ये(आदिवासींमध्ये) इतर जातींचा समावेश कोणत्याही परिस्थितीत होऊ नये,अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने मांडली असून या मागणीसाठी आज वाशीमच्या मंगरूळपीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन सादर केले.निवेदनात आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी असून त्यांची स्वतंत्र संस्कृती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.आजही आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यात राहतो, त्यामुळे मूलभूत विकासापासून वंचित असल्य