अंजनगाव सुर्जी: सोशल मीडियावरील ‘अंजनगाव विचारमंच’ ग्रुपचा स्नेहमिलन सोहळा महादेव भवन येथे उत्साहात संपन्न;आमदार, खासदार उपस्थित
अंजनगाव सुर्जी सोशल मीडियाच्या युगात सामाजिक, प्रशासकीय आणि विकासविषयक चर्चा घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘अंजनगाव विचारमंच’ या लोकप्रिय सोशल मीडिया ग्रुपचा स्नेहमिलन सोहळा आज दुपारी १ वाजता बोराळा रोडवरील महादेव भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.२०१५ साली स्थापन झालेल्या या ग्रुपमध्ये आमदार, खासदार, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी,प्राध्यापक,शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी म्हणून सदस्य म्हणून कार्यरत आहेत