चंदनवाडी परिसरामध्ये एका व्यक्तीला तीन ते चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आज मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका यादव नावाच्या व्यक्तीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदरच्या व्यक्तीला काहीजण मारत होते तर एक जण हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होता. रेकॉर्ड केलेला सर्व प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.