निफाड: कांद्याला शासकीय अनुदान दया
आमदार दिलीपराव बनकर यांची केंद्र व राज्य सरकार कडे मागणी
Niphad, Nashik | Sep 17, 2025 कांदा उत्पादक शेतकयांना उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यासह महाराष्टतील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला असून शासनाविषयी व शासनाच्या धोरणाविषयी असंतोष व्यक्त करीत आहे त्यामुळे शेतकऱ्याचा सातत्याच्या मागणीचा विचार करून केंद्र व राज्य शासनाकडून कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त अनुदान जाहीर करावे अशी मागणी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत केली