चांदूर रेल्वे: विरूळ फाटा जिल्हा परिषद शाळा येथे गणपती पाहण्याकरिता गेलेल्या युवकाची दुचाकी हँडल तोडून चोरट्याने केली लंपास
नितीन सुरेशराव गोखले राहणार क्रांती चौक यांनी अज्ञात इसमाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे नितीन हा गणपती पाहण्यासाठी दुचाकी हँडल लॉक करून गेला असता काही वेळाने परत आला असता मोटरसायकल दिसली नाही काळया रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच २७ सी एन 7619 अंदाजे किंमत 45 हजार रुपयाची कोणीतरी अज्ञात इसमाने हँडल लॉक तोडून चोरून नेले अशी तक्रार पोलिसात दिली आहे तेव्हा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.