कळमनूरी: येहळेगाव तु. येथे विविध चार ठिकाणी चोरीच्या घटना, नगदी रकमेसह चांदीच्या दागिन्यावर चोरांचा डल्ला,पोलिसात गुन्हा दाखल
कलमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम येथे विविध चार ठिकाणी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते सकाळी चार वा सुमारास अज्ञात चोरट्यानी नगदी 42000/ रुपये आणि 12000/ रुपये किमतीचे दागिने असा एकूण 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे .याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर आज दि.18 ऑक्टोबर रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके हे अधिक तपास करीत आहेत .