पूरग्रस्त भागातील नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा
2.5k views | Nanded, Maharashtra | Oct 4, 2025 - डॉ संगिता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.प्रकाश आबीटकर व आरोग्य सचिव व आयुक्त आरोग्य सेवा यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यात खालील ठिकाणी तज्ञांच्या वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत. दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय लोहा, ग्रामीण रुग्णालय अर्धापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंधी या भागातील नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.