एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे, जबरी चोरी, मारहाण, धमक्या आदी गंभीर स्व) पाचे गुन्हे करून उद्योजक, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त (परिमंडळ-एक) पंकज अतुलकर यांनी ही कारवाई केली आहे.