अकोला जिल्ह्यात येलो अलर्टनंतर पातुर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले सोयाबीन, तुर आणि मुग या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातात आलेला घास हिरावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नागपूर हवामान विभागानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.