महागाव: तालुक्यातील मोरथ येथे रेती माफियांकडून पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, एपीआय जखमी
महागाव तालुक्यातील मोरथ येथे रेतीची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना आज दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात एपीआय अंभोरे यांच्या हाताला दुखापत झाली असून आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाले. ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी सिमेंटचे मोठे झाकण फेकून मारले यात ते जखमी तसेच पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली.