शिरूर कासार: गोमळवाडा येथे पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक घरांची पडझड संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान
शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा गावात आलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शिंदफना नदी व परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे गावात पाणी शिरले व अनेक घरांची भिंती कोसळून पडझड झाली. यामध्ये नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, फर्निचर आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब बेघर झाली असून, काहींना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. गावातील रस्ते, शेतजमिनी आणि घरांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश