नांदेड: पूरग्रस्त राहेगावात मदतीचा ओघ सुरूच; महसूल प्रशासनाच्या सहकार्याने धान्य किटचे वाटप
Nanded, Nanded | Oct 6, 2025 नांदेड तालुक्यातील पूरग्रस्त राहेगावातील नागरिकांसाठी मदतीचा सुरूच आहे विविध सामाजिक संघटना आणि शासकीय यंत्रणा एकत्र येऊन मदत कार्य हाती घेत आहेत.महसूल प्रशासनाच्या सहकार्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ग्रामस्थांना धान्य कीटचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना विष्णुपुरी यांनीही या मदत कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून धान्य कीट उपलब्ध करून दिले. गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे राहेगावला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क जवळपास दहा दिवस होता.