जळगाव शहरातील पायघन हॉस्पिटलसमोर जुन्या वादातून एका तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.