वर्धा: देवळी येथे इंदिरा गांधीजींच्या पुतळ्याला बांधलेला कापड विटंबनेचा प्रकार नाही:काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर
Wardha, Wardha | Sep 21, 2025 देवळी शहरातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या तोंडाला अज्ञात व्यक्तीने कापड बांधल्याने विटंबनेचा प्रकार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघड झाला आहे. या घटनेची काँग्रेस पक्षाने तीव्र दखल घेत, देवळी शहर काँग्रेस कमिटी आणि युवा संघर्ष मोर्चा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.आरोपीची व सीसीटीव्हीची माहिती घेतली असता सदर व्यक्तीने आधी पुतळा पाण्याने साफ केला व नंतर कापडाने पुसून काढला व चेहऱ्यावर कापड बांधत त्याने नंतर पुतळ्याला हात जोडून अभिवादन केले,हा व्यक्ती विमनस्क परिस्थित दिस