चंद्रपूर: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ ते ३ डिसेंबर 'ड्राय डे'
चंद्रपूर : जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि एक नगरपंचायत येथे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ ते ३ डिसेंबर या तीन दिवसांदरम्यान मद्य, बिअर आणि ताडी विक्री संपूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी जारी केले आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने मुक्त, शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.