कामठी: हमालपुरा येथे अचानक घराला लागली आग सुदैवाने जीवितहानी नाही, घरातील संपूर्ण सामान जळून खाक
Kamptee, Nagpur | Sep 20, 2025 हमालपुरा येथे सतीश गजभिये यांच्या घरात अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.सतीश गजभिये आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाच्या शाळेत पालकांच्या मीटिंगसाठी गेले होते. त्याच वेळी, त्यांच्या बंद घरात अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.