गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसाने गणेश पेठ हद्दीतील राजवाडा पॅलेस येथे दुचाकीने फिरणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. अटकेतील आरोपीचे नाव दानिश खान दिलावर खान पठाण असे सांगण्यात आले आहे. अंग झडती दरम्यान आरोपीकडून 53.68 ग्राम एमडी मिळून आली आरोपीकडून तीन मोबाईल, दुचाकी व एमडी, वजन काटा व इतर साहित्य असा एकूण चार लाख 18 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.