भद्रावती: युवासेनेच्या लोकसभा सचिवपदी सुरज शहा यांची तर जिल्हा संघटक पदी सुमीत हस्तक यांची नियुक्ती.
चंद्रपूर जिल्हा युवासेनेची नवी कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन युवासेनेच्या लोकसभा सचिवपदी सुरज शहा यांची तर जिल्हा संघटक पदी सुमीत हस्तक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हस्त यांचेकडे वरोरा,चिमुर व ब्रम्हपुरी या विधानसभा क्षेत्राचा कार्यभार देण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे ऊभयतांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षसंघटन मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.