पनवेल: खारघरमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; आ. प्रशांत ठाकूर यांची भेट
Panvel, Raigad | Mar 16, 2026 नागरिकांच्या महसुली अडचणींचे जागेवरच निराकरण करण्याच्या उद्देशाने खारघर येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून विविध महसुली समस्या सोडवण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत आमदार ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.