प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर शहर पोलिसांनी शनिवारी १० जानेवार रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. याठिकाणाहून इरफान शाह आजम शाह (वय ३३, रा. सिटी कॉलनी) याला अटक केली असून त्याच्याकडून ७ हजार रुपये किंमतीचे ७ नायलॉन मांजाचे रिळ व मांजा गुंडाळण्याचे मशिन जप्त केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.